सजगीर-हिरागीर महाराज

सजगीर हिरागीर महाराज सध्याच्या काळातील जागरूक देवस्थान असुन थुना नदी तिरावर महाराजांनी घेतालेली हि समाधी आहेरवाडी गावाच्या पश्चिमेस आहे. हा परिसर सजगीर कृपेने अतंत्य रमणीय हवा हवासा वाटणारा आहे.

Read More

रामगिरी महाराज

प.पु. महंत गुरुवर्य ब्रम्हलीन श्री रामगीरी महाराज

सजगीर हिरागीर महाराजांचे वारसदार महंत श्री गुरुवर्य रामगिरी महाराज यांची समाधी सजगीर हिरागीर महाराजांच्या शेजारी आहे.....

Read More

हर हर महादेव

कार्यक्रम


सजगीर चरणाची आरती

आरती सजगीर चरणाची | संतरूपे दु:ख हरण्याची||
प्रकटले भक्त तारान्याशी| आरती सजगीर चरणाची ||
जन म्हणतात देव त्याशी | चला जाऊ पाहण्या आहेरवाडीशी ||
बैसले संत असणाशी |आरती सजगीर चरणाची ||
मनोहर रूप दिसे सावळा| गळयामध्ये रुद्राक्षी माळा||
मंदिरी गर्दी दर्शनाची | आरती सजगीर चरणाची ||
भावना असे जैसी ज्याची | दर्शन होये तैसे त्याशी| आहेरवाडी थुना पाप नाशी | प्रकट केले महाराष्ट्राशी||आरती सजगीर चरणाची ||
पहा हो प्रती अमावशेला | भक्तजन होती बहु गोळा ||
भक्त हा न्यास पाहून देवास | विसरला शुद्ध बुद्ध देहाची||
आरती सजगीर चरणाची | संतरूप दु:ख हरण्याची ||
प्रकटले भक्त तारान्याशी आरती सजगीर चरणाची ||

पालखी

सजगीर महाराज,हिरागीर महाराज आणि गुरुवर्य रामगिरी महाराज यांचा पालखी सोहळाची सुरुवात बारशीच्या दिवशी सायंकाळी होते.पालखीच्या सुरुवातीस सर्व रस्त्यावर सडे टाकले जातात त्यावर सुंदर रांगोळी काढण्यात येते.सायंकाळी ७ वा. पालखीची सुरुवात होते.सजगीर-हिरागीर-रामगिरी महराजांचे मुखवटे सजवून पालखी मध्ये ठेवतात.देवाच्या मुर्त्या बोलक्या वाटू लागतात त्यांना पहिले कि माणसांचे मन सुखाने प्रसन्न होते.महादेव मंदिरात श्रींच्या पालखीची पूज्य करून पालखी पुढे निघते.पालखीच्या समोर बॅड वाजत निघतो त्याच्या तालावर काठ्या नाचतात ,टाळ मृदुंग विना घेऊन भजनी मंडळी हरिनामाचा जयघोष करीत चालतात.

कुस्ती

कुस्ती हा खेळ अतंत्य पारंपरीक्षा असुन,महाराष्ट्रातील अनेक मल्लांनी देशात आपले नाव गाजवलं.हा खेळ लहान तसेच मोठ्यांना वेड लावणारा आहे.त्यालानुसरून , आहेरवाडी येथे कुस्तीचे आयोजन करण्यात येते.
आहेवाडी येथे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक मल्ल सहभागी होतात.
आहेरवाडीत जंगी कुस्तांचे आयोजन यात्रे दरम्यान आमली बारस (चैत्र शु. द्वादशी) या तिथीच्या दुसऱ्या दिवशी केले जाते .
कुस्त्यांचे जंगी सामने पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते.
कुस्त्यांमध्ये जिंकणाऱ्या मल्लांना योग्य ते परितोषिक देण्यात येते.

महाप्रसाद/भंडारा

त्रयोदिशीच्या दिवशी जो तो खुशीत असतो कारण आज देवाचा भंडारा असतो. भंडारा म्हणजे वांग्याची भरडा मिसळून केलेली भाजी आणि ज्वारीची भाकरी.भंडाऱ्याला सुरुवात सकाळी पासुनच होते.भाजी साठी गावकर्यांच्या वतीने वांगी जमा केली जातात.भाजी करण्यासाठी मोठी कडाई वापरतात,खमंग फोडणी देऊन भाजी तयार केली जाते.पंचक्रोशीतील तशेच आजु बाजुच्या जिल्यातील भक्तगण मोठ्या भक्तिभावाने हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात.

यात्रा

सजगीर महाराजांची यात्रा आमली बारस (चैत्र शु. द्वादशी) या तिथीला भरते.आमली बारस म्हणजे एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धात भक्ताजांना यात्रेची चाहूल लागते.या चैत्र महिन्याचीच भक्त लोक मोठ्या आतुरतेने वाट पाहतात .सजगीर महाराजांच्या यात्रेचे वेध गावकऱ्याना नाही तर पर गावातील पाहुण्यांना पण वेध लागते.विशेष म्हणजे यात्रेला सर्व जाती धर्माचे लोक येतात .येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केल्या जात नाही.

दिंडी/पदयात्रा

श्रावण महिन्यात आहेरवाडी ते माहुर पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते.

सप्ताह/भागवत कथा

यात्रेच्या पूर्वी ८ दिवस भागवत कथा ,ज्ञानेश्वरी पारायण आयोजन केले जाते.

सेवाहेतु/उद्देश

    या संकेत स्थळाच्या माध्यमातुन आहेरवाडी व पंचक्रोशीतील गावांना सामाजिक ,सांस्कृतिक ,शालेय ,शेतीविषयक ,आर्थिक ईत्यादि बाबतींची माहिती,सहकार्य व मार्गदर्शन पुरवणे हा असेल .
    या संकेत स्थळाचा अधिकाधिक प्रमाणात वापर करण्यास सहकार्य करावे.
    वरील नमूद केलेल्या बाबी पुर्णत्वास नेण्यास सर्व स्तरांतील व्यक्तींचा हातभार आवश्यक आहे.
    हे संकेत स्थळ गावातील तरुणांच्या क्षमतेचे प्रतिक व तंत्रज्ञानात असलेले कौशल्य याचा एक बहुउपयोगी संगम आहे.

सौजन्य

  1. श्री. नारायणगिरी महाराज -मठाधिपती श्री. क्षेत्र सजगीर हिरागीर रामगिरी महाराज संस्थान आहेरावाडी
  2. सौ.रा.स.मोरे व मोरे यस. डी.-श्री. रामगिरी महाराज (जिवन चरित्र )
  3. प्रा. माधवकुमार मोरे -श्री. सजगीर हिरागीर महाराज (जिवन चरित्र )
  4. ज्ञानेश्वर मोरे,मुंजाजी मोरे ,हिरामण मोरे,बालाजी मोरे -छायाचित्रे ,ऑडीओ /विदिओ
  5. संतोष मोरे,बापूराव मोरे,सतीश घाटोळ -छायाचित्रे ,ऑडीओ /विदिओ,आहेरवाडी ते माहुर पायी दिंडी विदिओ

श्री क्षेत्र आहेरवाडी


पूर्णा,परभणी