जिवन प्रवास व कार्य

प.पु. महंत गुरुवर्य ब्रम्हलीन
श्री रामगीरी महाराज

ज्या अंगी मोठेपण | तया यातना कठीण||
या उती प्रमाणे बाबाजींच्या आयुष्याची सुरुवात झाली.बाबा अवघ्या नऊ महिन्याचे असताना महाराजांचे पितृ छत्र हरवले आणि बाबा अडीच वर्षांचे असताना महाराज मायेच्या उबेपासून पोरके झाले. माता-पितांच्या देहान्तानंतर महाराज आपल्या भावन्दांसोबत मामाच्या गावी वसमत येथे गेले.
१९५७ मध्ये बाबांचे परत आहेर्वाडीत आगमन झाले.

आजोबांचा नवस
महाराजांच्या आजोबांचा नवस पूर्ण करण्यासाठी महाराजांना देवाला सोडण्यात आले.

आनंद आखाडा
समाजामध्ये सुख शांती व समाधान नांदावे व धर्माचे अधर्मापासून रक्षण करण्यासाठी आनंद आखाड्यात प्रयत्न केले जातात.


स्वामी सागरानंद्जी यांच्याशी भेट:१९६८
सजगीर-हिरागीर महाराज यांच्या समाधी पासून प्रेरणा घेऊन पंच महामंडलेश्वर आनंद आखाड्याच्या झुंडीत सामील झाले.
पहिला चातुर्मास:पिंपळगाव
दुसरा चातुर्मास:देवलापर(लातूर जवळ)

संन्यासविधी: फेब्रुवारी १९७१
१९७१ सालच्या फेब्रुवारी महिन्यात आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी सागरानंद्जी सरस्वती यांच्या कडून मठाच्या श्री.सजगीर महराज व श्री.हिरागीर महाराज यांच्या समाधी च्या नावाने गुरुवर्य महंत श्री. रामगीर महाराज यांचा पूर्ण सन्यास विधी सोहळा हजारो साधुंच्या उपस्थितीमध्ये सम्पन्न झाला.

शेवगा:१९७४
शेवगा येथील श्री. नारायणराव धुमाळ व हरणाबाई धुमाळ यांनी महाराजांची सेवा केली.

कार्यभूमी आहेरावाडीत आगमन

  1. सन्यास विधी सोहळ्यानंतर तब्बल सहा वर्षानंतर आहेरावाडीत आगमन.
  2. कुस्तीचा नाद
  3. मंदिरात राहणे.
  4. झोळी मागून आणणे
  5. चमत्कारिक अवतार
  6. आहेरावाडीतील प्रत्येक व्यक्ति निकट.
  7. निर्मोही साधुत्व.

समाधी :१२ शके १९३३ (१५-०४-२०११ )
महाराजांचे समाधी घेणे हे पूर्वनियोजित होते .
प.पु.महंत श्री रामगिरी महाराज यांनी त्यांचे वारस असणारे व जन्मापासुन सन्यास दीक्षा घेतलेले श्री. नारायण गिरी महाराज यांना समाधीस्त होण्याच्या आठ दिवस अगोदर मठावर बोलावून घेतले व तू कुठेही जाऊ नकोस असे सांगितले.हि गुरुवर्य महंत श्री रामगिरी महाराजांची हि समाधी सोहळ्याची पूर्व तयारी होती.
ऐसिया सम योगाची निवृत्ती |लाहोनि जे देह ठेवितीभर| ते ब्रह्माची होता | ब्रह्मविद्य
अश्या तर्हेने गुरुवर्य महंत श्री. रामगिरी महराजांनी स्थान,वेळ,दिवस,मुहुर्त सर्वच निश्चित केलेला होता आणि खरोखरच याच योगाला श्री. सजगीर महाराज व हिरागीर महाराज यांच्या वार्षिक समाधी च्या पालखी च्या कार्यक्रमाच्या दिवशी संध्यापुजा आटोपून समाधीच्या समोर स्नानाचा आग्रह असताना समाधीच्या पाठीमागे स्नान करीत असताना आपल्या प्रिय भक्तांना "समाधीजावलील वृक्षांची काळजी घ्या " असा शेवटचा संदेश देऊन श्री. सजगीर महाराज व श्री. हिरागीर महाराज यांच्या समाधीच्या सानिध्यात चैत्र शु. १२ शके १९३३ (दि.१५-०४-२०११ ) रोजी ब्रह्मलीन झाले.


तपस्वी प.पु. महंत श्री रामगिरी बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
आहेरवाडी नगरीला पदस्पर्शाने पावन करणाऱ्या महंत श्री.गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या चरणी शत शत कोटी प्रणाम
हर हर महादेव | हर हर महादेव ||