मराठवाड्यात पूर्णा हिंगोली रोडवर चौडी स्टेशनच्या पश्चिमेस १४ मैलावर आहे.१२ ज्योतिर्लिंगा पैकी ८ वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ आहे.या ठिकाणाचे माहात्म्य प्राचीन ग्रंधात/पुराणात मिळते.



दक्षिणेत बारा ज्योतिर्लिंगा पैकी परळी वैद्यनाथ हे एक आहे.यांचे स्थान मराठवाड्यात परभणी स्टेशन पासून २४ मैल दक्षिणेस आहे.तेथील शिवालय प्रशस्त असून या ठिकाणी कुष्टरोगापासून मुक्त होण्या करिता पुष्कळ रोगी येतात.शिवपुराणातील श्लोका प्रमाणे 'वैद्यनाथं चिता भुमौ ' असा पाठ आहे .१२ ज्योतिर्लिंगांच्या श्लोकात 'वैद्यनाथं चिता भुमौ ' या एवजी 'परल्यां वैज्यानाथं' असा पाठ आहे.